Top Public News
 Advertisement

 General News

"दहशतवाद्यांना भारताचे जशास तसे चोख उत्तर" "हम भी कुछ कम नही" यह तो अभी सुरुवात है, आगे आगे देखो होता है क्या? भारताचे पाच मोठे महत्त्वपूर्ण निर्णय पाकची सर्व बाजूंनी कोंडी. १)१९६० ला लागू झालेला सिंधू पाणी करार भारताने ताबडतोब स्थगित केला

सौ.प्रतिभाताई पाटील    24-04-2025 05:53:53   204

"दहशतवाद्यांना भारताचे जशास तसे चोख उत्तर"

    "हम भी कुछ कम नही"

   यह तो अभी सुरुवात है, आगे आगे देखो होता है क्या? 

 भारताचे पाच मोठे महत्त्वपूर्ण निर्णय पाकची सर्व बाजूंनी कोंडी. 

१)१९६० ला लागू झालेला सिंधू पाणी करार भारताने ताबडतोब स्थगित केला आहे. 

२) अटारी बॉर्डर ताबडतोब बंद करण्यात आली आहे. जर कोणी भारतीय पाकिस्तान मध्ये असतील तर त्यांनी आठ दिवसातच म्हणजे एक मे २०२५ पर्यंत भारतात परत यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

३) पाकिस्तानी नागरिकांना भारतीय विसा बंद करण्यात आलेला आहे. 

४) एका आठवड्यामध्ये भारतात असलेल्या पाकिस्तानी, राजकीय अधिकाऱ्यांनी भारत देश सोडावा असे आदेश देण्यात आले आहे. 

५) भारतातील पाकिस्तानी उच्च आयोग बंद करण्यात आला आहे. त्यामध्ये अधिकाऱ्यांना पाकिस्तानात माघारी जाण्याचे आदेश दिले आहेत. 

 भारताने योग्य वेळी योग्य भूमिका घेतल्याबद्दल भारत सरकारचे अभिनंदन. 

टॉप पब्लिक न्यूज साठी ,

   मुख्य संपादिका, सौ. प्रतिभाताई पाटील. 

(भारत सरकारने पाकिस्तान विरुद्ध घेतलेल्या भूमिका आपणास कशा वाटल्या.)






 News Videos
 Advertisement