टॉप पब्लिक न्यूज -: पुणे- गुन्हेगारीचे आगर बनत चाललेले पुण्याचे दक्षिण द्वार कात्रज मधील मांगडेवाडीततील प्रीतम हाईटस मध्ये छापा टाकून भारती विद्यापीठ पोलिसांनी सुमारे ४४ लाखाचा चरस -गांजा जप्त करून अरोरा नामक ५० वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. बोगस दारू, अंमली पदार्थ, आणि लुटमार या परिसरात वाढतच चालली असून त्या अनुषंगाने पोलिसांनी आता कंबर कसली आहे आणि गुन्हेगारांची धरपकड सुरु केली आहे.
✒️✒️✒️🗞️🗞️🗞️✒️✒️✒️
या कारवाईत अंमली पदार्थ विरोधी पथकाकडुन ४३,८७,०००/- रु किं. चा चरस व गांजा जप्त करण्यात आला असे पोलिसांनी सांगितले , पोलिसांनी असेही पुढे सांगितले कि,’दि.१०/०१/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, चे सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व स्टाफ असे भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना मिळालेले बातमीवरुन इसम नामे अरुण अशोक अरोरा वय-५० वर्षे, रा-प्रितम हाईट्स, मांगडेवाडी, कात्रज पुणे याच्या ताब्यात एकुण ४३,८७,०००/- रू.कि.चा ऐवज त्यामध्ये २ किलो १४० ग्रॅम चरस व १ किलो ७९० ग्रॅम गांजा अंमली पदार्थ तसेच इतर ऐवज जप्त करून त्याचे विरुध्द भारती विदयापिठ पोस्टे गु.र.नं.२७/२०२४, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अनिकेत पोटे, अं.प.वि.प.१. गुन्हे शाखा, पुणे शहर हे करीत आहेत.
✒️✒️✒️🗞️🗞️🗞️🗞️✒️✒️✒️🗞️🗞️✒️✒️✒️
हीकारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे,निखील पिंगळे सहा पोलीस आयुक्त, गुन्हे.२, राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार योगेश मांढरे, प्रशांत बोमादंडी, नितीन जगदाळे, आझाद पाटील, संदिप जाधव, दिशा खेवलकर, रविंद्र रोकडे यांनी केली आहे.
टॉप पब्लिक न्यूज रिपोर्टर -: प्रशांत