Top Public News
 Advertisement

 General News

दारूपित असताना झालेल्या वादातून डोक्यात सिलेंडर घालून एकाचा खुन;

प्रशांत बोलसरे   20-12-2024 02:39:22   72

टॉप पब्लिक न्यूज -: 

▪️दारू पित असताना झालेल्या वादातून डोक्यात सिलेंडर घालून एकाचा खुन; आळंदीतील काळेवाडी येथील घटना, आरोपी अटकेत

✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️

▪️पिंपरी : – दारु पित बसले असताना झालेल्या वादातून मजुराच्या डोक्यात सिलेंडर घालून त्याचा खून करण्यात आला. याप्रकरणी दिघी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

📰📰📰📰📰📰📰📰📰

संतोष शंकर खंदारे (वय ४५, रा. काळेवाडी, धाकट्या पादुका मंदिराशेजारी, आळंदी) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. पोलिसांनी गणेश खंदारे (वय २३, रा. काळे कॉलनी, चर्‍होली, मुळ रा. वाशीम) याला अटक केली आहे. ही घटना संतोष खंदारे याच्या घरी रविवारी सायंकाळी सात वाजता घडली.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

याबाबत बद्री विठ्ठल चव्हाण (वय ३५, रा. काळे कॉलनी, चर्‍होली, ता. हवेली) यांनी दिघी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

✒️✒️✒️🧾🧾✒️✒️✒️

▪️याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष खंदारे आणि गणेश खंदारे हे दोघेही मजुर आहेत. ते रविवारी सायंकाळी संतोष याच्या घरी दारु पित बसले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. तेव्हा रागाच्या भरात गणेश याने घरातील सिलेंडरच्या सहाय्याने संतोष खंदारे यांच्या डोक्यात मारला. त्यात संतोष जखमी होऊन त्यांचा मृत्यु झाला. पोलिसांनी गणेश खंदारे याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक रणवरे तपास करीत आहेत.

टाॅप पब्लिक न्यूज संपाद  प्रशांत 






 News Videos
 Advertisement