दौंड मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई.
दौंड तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक माधव रेशवाडा (वय 54 राहणार दौंड) याला दहा हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक वीरनाथ मारणे यांनी रंगेहात पकडले
याबाबत समजलेली माहिती पुढीलप्रमाणे महसूल सहाय्यक माधव रेशवाडे यांनी फिर्यादीचे घर जप्ती प्रकरण पुढे ढकलण्याकरता दहा हजार रुपये लाच मागितली होती; तक्रारदाराने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून सर्व हकीकत सांगितली त्यानुसार काल दिनांक 30 जानेवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास गोपाळवाडी येथील सरपंच वस्तीवर माधव रेशवाडा यास दहा हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विरनाथ माने; सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण व पोलीस शिपाई तावरे; दिनेश माने यांचे पथकाने केली
टॉप पब्लिक साठी नरेश टाटिया दौंड