Top Public News
 Advertisement

 General News

Ram Mandir : राम मंदिरासाठी सर्वाधिक देणगी कोणी दिली?

प्रशांत बेलोसे    22-01-2024 11:30:01   83

टॉप पब्लिक न्यूज : आज 22 जानेवारी आहे. आज रामलल्लांची अयोध्यामध्ये प्राणप्रतिष्ठा होणार आहे. लाखो भाविक अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत. सर्वत्र भक्तिभावाचं वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा सोहळा सुरू होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत. श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मंदिर सजवण्यात आलं आहे. राम मंदिर हे पूर्णपणे भक्तांनी जी देणगी दिली त्या देणगीमधून उभारण्यात आलं आहे. राम मंदिरासाठी सरकारकडून कोणताही खर्च करण्यात आलेला नाहीये. राम मंदिरासाठी अनेक जणांनी मोठी मदत केली.

मात्र यामध्ये श्रीरामांचा एक भक्त असाही आहे, ज्याने राम मंदिर निर्माणसाठी देणगी देण्याच्या बाबतीत सर्वांना मागे टाकलं आहे. जाणून घेऊयात राम मंदिरासाठी सर्वाधिक देणगी देणाऱ्या व्यक्तीबाबत. सूरतच्या व्यावसायानं हिरे व्यापारी असलेल्या लाखी परिवाराकडून राम मंदिरासाठी तब्बल 101 किलो सोनं अर्पण करण्यात आलं आहे. दिलीप कुमार व्ही, लाखी यांनी राम मंदिरासाठी तब्बल 101 किलो सोनं दान केलं आहे. हे राम मंदिर ट्रस्ट्रला आतापर्यंत मिळालेलं सर्वात मोठं दान आहे.

सध्या मार्केटमध्ये सोन्याची किंमत 68 हजार रुपये प्रति तोळा इतकी आहे. यानुसार हिशोब केल्यास लाखी परिवाराकडून राम मंदिरासाठी तब्बल 68 कोटी रुपयांचं दान देण्यात आलं आहे. हे आतापर्यंतचं राम मंदिरासाठी आलेलं सर्वात मोठं दान आहे. या यादिमध्ये दुसरा क्रमांक लागतो तो कथावाचक आणि आध्यात्मिक गुरु मोरारी बापू यांचा, मोरारी बापू यांनी राम मंदिरासाठी तब्बल 11.3 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर गुजरातचे हिरे व्यापारी गोविंदभाई ढोलकिया हे आहेत. त्यांनी राम मंदिरासाठी तब्बल 11 कोटी रुपयांचं दान दिलं आहे.

टॉप पब्लिक न्यूज रिपोर्टर -: प्रशांत






 News Videos
 Advertisement