*शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असलेला वॉटर बेल (पाणी पिण्याची घंटा) उपक्रम पुन्हा सुरू करा - आमदार राहुल कुल यांची मागणी*
शालेयस्तरावरती विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असलेला वॉटर बेल (पाणी पिण्याची घंटा) उपक्रम पुन्हा नव्याने सुरू करा अशी मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत केली आहे.
या संदर्भात विधानसभेत बोलताना आमदार कुल म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील प्रकाश शेलार या शिक्षकांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये महाराष्ट्र राज्यातील पहिला वॉटरबेल उपक्रम त्यांच्या शाळेत सुरू केला.
वॉटरबेल म्हणजे पाणी पिण्यासाठी देण्यात येणारी बेल विद्यार्थ्यांना स्वच्छतागृहासाठी व जेवणासाठी लहान व मोठी सुट्टी असते त्याप्रमाणे चालू तासिकेमध्ये आपल्या बाटलीतील पाणी पिता यावे म्हणून दोनदा किंवा तिनदा वॉटर बेल शालेय स्तरावर देण्यात यावी कारण आजकाल अनेक विद्यार्थी शाळेमध्ये गेल्यानंतर पाणीच पीत नाहीत असा अनुभव आहे.
या स्तुत्य उपक्रमाची दखल महाराष्ट्राच्या तात्कालीन शिक्षण मंत्री यांनी घेतली व जानेवारी २०२० महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये वॉटर बेल बंधनकारक केली. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांमध्ये कोरोणासारखा गंभीर आजार आला. तेव्हापासून अनेक शाळा राबवत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वॉटर बेल (पाणी पिण्याची घंटा) हा उपक्रम नव्याने शाळांना बंधनकारक करावा अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी आज विधानसभेत केली.
प्रतिनधी:- नरेश टाटिया सह T PN , दौंड