Top Public News
 Advertisement

 पूर्ण तपशील

स्री जन्माच्या स्वागताची मानाची पैठणी या कार्यक्रमात महिलांना लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी आंबेठाण येथे आज संध्याकाळी पाच वाजता

News Reporter   16-05-2022 09:52:42   187

चाकण : खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीप आण्णा मोहिते पाटील यांच्या सौभाग्यवती पत्नी सौ.सुरेखाताई मोहिते पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आज संध्याकाळी पाच वाजता आंबेठाण येथील स्वर्गीय शरद जोशी क्रीडा संकुल येथे टी व्ही अँकर पूजा सुनील थिगळे प्रस्तुत स्री जन्माच्या स्वागताची मानाची पैठणी हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

  कार्यक्रमासाठी प्रमुख आकर्षण " पावनखिंड " चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्री माधवी निमकर

 " समरेणू " या मराठी चित्रपटाची संपूर्ण टीम तसेच अश्विनी मिठे सोनी मराठी इंडियन आयडॉल फेम उपस्थित राहणार आहे.

 खेड तालुक्यातील महिला भगिनींना भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.

  राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते गणेश बोत्रे,खेड तालुका पश्चिम विभाग अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आवाहन केले आहे.






 News Videos
 Advertisement