राजगुरूनगर : खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीप आण्णा मोहिते पाटील यांच्या सौभाग्यवती पत्नी सौ.सुरेखाताई मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ( दि.१६ ) आयोजित टी व्ही अँकर पूजा सुनील थिगळे प्रस्तुत स्री जन्माच्या स्वागताची मानाची पैठणी हा कार्यक्रम स्वर्गीय शरद जोशी क्रीडा संकुल आंबेठाण येथे संध्याकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमासाठी प्रमुख आकर्षण स्टार प्रवाह वरील " सुख म्हणजे नक्की काय असत ही सिरीयल " आणि " पावनखिंड " चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्री माधवी निमकर यांच्यासह ' " समरेणू " या मराठी चित्रपटाची संपूर्ण टीम आणि अश्विनी मिठे सोनी मराठी इंडियन आयडॉल फेम उपस्थित राहणार आहे.अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते गणेश बोत्रे,खेड तालुका पश्चिम विभाग अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली.खेड तालुक्यातील महिला,युवतींनी कार्यक्रमास उपस्थित राहून भरघोस बक्षीसे जिंकण्याची संधी मिळणार आहे.