Top Public News
 Advertisement

 पूर्ण तपशील

राजगुरुनगर मधील रोजच्या वाहतुक कोंडीने स्थानिक नागरिक पुरते हैराण

बाळासाहेब सांडभोर   15-05-2022 14:02:15   421

राजगुरुनगर : राजगुरुनगर मध्ये दररोजच रणरणत्या उन्हातही वाहतुक कोडी कमी होत नाही रस्त्याच्या दोन्ही कडेने वाहनाच्या रांगांच्या रांगा लागत आहे त्यामुळे पायी चालनेही मुश्किल झाले आहे या वाहतुक कोटीने राजगुरुनगर परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.दोन मिनिटात घरी जाणी-या माणसाला घरी पोहचण्यास अर्धा ते एक तास लागत आहे.पायी जाणा-याला रस्ता देखील ओलांडता येत नाही.या मुळे स्थानिक नागरीक पुरते हैराण झाले आहे.सध्या याञा जञा लग्न समारंभ यासारखे कार्यक्रम मोठ्या संख्येने होत असल्याने वाहतुकीवर ताण येत आहे.

राजगुरुनगर चे पोलीस निरिक्षक सतिश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली राजगुरुनगर चे वाहतुक पोलीस शिवाजी न-हे,बबन भवारी भाऊ कोरके,संतोष शिंदे संजय पावडे,तर नँशनल हायवेचे राजेंद्र बुरुड,दिलीप वाघोले,सहाय्यक फौजदार भिमाजी वायाळ हे पोलीस कर्मचारी उष्णतेचा पारा 42 अंशाच्यावर गेलेला असतानाही ऐन रणरणत्या उन्हात उभे राहुन.वाहतुक कोडी कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.

या वाहतुक कोडी चे प्रमुख कारणे म्हणजे पाबळरस्ता, राजगुरुनगर बस स्थानक, वाडारोडला,हे रस्ते अगदी जवळ जवळ असल्याने व याच मार्गावरुन जास्त वाहने जात असल्याने गावातही आणि पुणे नासिक महामार्गावर मोठी वाहतुक कोंडी होते.त्यामुळे परिसरातील लोकांना याचा मोठा ञास सहन करावा लागत आहे.

ही वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी वाड्याकडे आणि राजगुरुनगर शहरात जाण्यासाठी भिमानदीवर पुल बांधुन वाहतुक कोडी कमी करण्याचा प्रयत्न केला परंतु राजगुरुनगर शहरात कोर्टाच्या मागे नागरीक रस्त्याच्या दोन्ही बाजुने गाड्या पार्किंग करतात त्यामुळे या रस्त्यावरही वाहतुक कोंडी होताना दिसते तर राजगुरुनगर शहरात पायी चालनेही अवघड जाते शहरातील अंतर्गत रस्त्या दोन्ही बाजुने  वाहने पार्किंग केलेले असतात.याबाबत राजगुरुनगर परिषदेचे बिलकुल लक्ष नाही.नगरपरिषदेने गावातील वाहतुक नियंञित करण्यासाठी ट्राफिक गार्डची नेमणुक केली होती परंतु करोना काळात वाहतुक कोडी नसल्याने त्यांना इतरञ कामाला लावले परंतु नंतर या वार्डनला सफाई कामगाराचे काम देऊन त्यांना कचरा गाड्यावर काम लावले.नगरपरिषदे वर गेली एक वर्षापासुन प्रकाशक असल्याने शहरातील समस्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.नगरपरिषदेचे अधिकारी फक्त पाट्या टाकण्याचे काम करतात त्यांना नागरिकाच्या समस्यांचे काहीच देणे घेणे नाही.अशी दबक्या आवाजात नागरिकांची चर्चा आहे.






 News Videos
 Advertisement