राजगुरुनगर : खेड तालुक्यातील बुट्टेवाडी गावात महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत श्री.किसन सखाराम तळेकर यांच्या विहीर पुनर्भरण कामाचे उदघाटन मा.जि. अ.कृ.अ, पुणे श्री.ज्ञानेश्वर बोटे यांच्या हस्ते पार पडले.विहीर पुनर्भरण साठी या योजनेअंतर्गत शासन कमाल 18 हजार रुपये देणार असून जॉब कार्ड धारक मजुरा करवी काम करायचे आहे.या उदघाटन प्रसंगी उपविभागिय कृषी.अधिकारी, राजगुरूनगर, श्री.मनोज ढगे,तालुका.कृषी.अधिकारी, खेड श्री.नंदू वाणी, मंडळ कृषि अधिकारी, खेड श्री.सोमनाथ गावडे, कृषि पर्यवेक्षक खेड,श्री.प्रविण शिंदे, कृषी सहायक, श्रीम.दीपाली पवार ,माजी उपसरपंच श्री.नामदेव तळेकर, पोलीस पाटील श्री.गणेश तळेकर,कृषि मित्र श्री.काशिनाथ तळेकर, कृषि संसाधन व्यक्ती श्री.सतीश तळेकर, खेड मंडळातील सर्व कर्मचारी, अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर योजनेत समाविष्ट होण्यासाठी कृषि विभागाच्या कर्मचारी,अधिकारी यांचेशी संपर्क करण्याचे आवाहन मंडळ कृषि अधिकारी, खेड सोमनाथ गावडे यांनी केले.