औरंगाबाद : पुणे येथे होणाऱ्या सब जूनियर मुली व मुलांच्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी औरंगाबाद संघाची घोषणा शहर संघटनेचे सचिव पंकज भारसाखळे यांनी केली.
विभागीय क्रीडा संकुलाच्या बॉक्सिंग हॉलमध्ये नुकत्याच झालेल्या निवड चाचणी स्पर्धेतून औरंगाबाद शहराचा बॉक्सिंग संघ निवडण्यात आला. विविध बचत गटात विजय ठरलेला खेळाडूंचा औरंगाबाद शहर बॉक्सिंग संघात समावेश करण्यात आला असून, मुलां मध्ये ३५-३७ किलो: मनीष कप्पा, ३७-४० किलो: यशवंता अवकाळे, ४०-४३ किलो: व्यंकटेश शेवालिकर, ४३-४६ किलो: अथर्व ढाकणे, ४६-४९ किलो: सिद्ध जयस्वाल, ४९-५२ किलो: समर्थ मुळे, ५२-५५ किलो: प्रज्ञेश झोडगे, ५५-५८ किलो: जुबेर शेख, ५८-६१ किलो: हर्षवर्धन दुळघाचा, ६१-६४ किलो: रणवीर राजुरा, ६७-७० किलो: सौरभ गोरडे, ७०+ किलो: कुलजीत सिंग तर मुलींच्या ३२-३४ किलो वजन गटात: जानवी वानखडे आणि ३६-३८ किलो वजन गटात संस्कृती वाघ यांचा समावेश आहे. तसेच संघाच्या प्रशिक्षकपदी राहुल टाक आणि अजय जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.