चाकण : स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितिन गुलाबराव गोरे यांची महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळच्या सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.
राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या आदेशानुसार राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळच्या सदस्यपदी स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांचे बंधू नितीन गुलाबराव गोरे यांची निवड करण्यात आल्याचे पत्र राज्याचे सहसचिव सूर्यकांत निकम यांनी दिले आहे.
नितीन गोरे यांच्या निवडीचे खेड तालुक्यातील सर्व स्तरातून स्वागत होत आहे.