राजगुरूनगर : शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांच्या विशेष सहकार्याने हुतात्मा राजगुरू महाविद्यालया समोर खेड येथे तालुक्यातील जनतेसाठी जी.आय. सर्व्हिस ग्रुप ॲन्ड कंपनी यांच्या वतीने अल्पदरात वस्तु (75 % सवलतीच्या दरात) या स्किमचा शुभारंभ सोहळा संपन्न झाला. या स्कीमचा लाभ ग्राहकांना पुढील दहा दिवस घेता येणार आहे.
उद्घाटन प्रसंगी मा आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे यांनी मनोगत व्यक्त करताना इतक्या मोठ्या प्रमाणात डिस्काउंट हा प्रथमच पहावयास मिळत आहे असे म्हटले तसेच आता लग्न सराई असून पिठाची चक्की, टीव्ही, फिल्टर या वस्तू नवरी कडील मंडळींना झाल ( आंदण ) म्हणून देण्यासाठी उपयोग होऊ शकतो व हे पुण्याचे काम आहे. असे संबोधत जिल्हा परिषद सदस्य बाबाजी शेठ काळे व जी.आय.सर्विस ग्रुप ॲन्ड कंपनीला शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव वर्पे, खेड तालुकाप्रमुख रामदास आबा धनवटे, जिल्हा संघटक महिला आघाडी विजयाताई शिंदे, मा.सभापती भगवानशेठ पोखरकर, मा.उपसभापती ज्योतीताई आरगडे, समर्थ फाउंडेशन चे विजयसिंह शिंदे पाटील, GI कंपनीचे सर्वेसर्वा चंद्रकांत काजळे, उपतालुकाप्रमुख बाप्पुसाहेब थिटे, उपतालुकाप्रमुख केशवशेठ आरगडे, शेतकरी सेनेचे एल.बी तनपुरे, ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाध्यक्ष सुदामराव कराळे, शहरप्रमुख दिलीप तापकीर, सरपंच मारूती सातकर, एकनाथजी सांडभोर, युवासेना शहरप्रमुख पप्पुशेठ राक्षे, उपसरपंच सतिश मलघे, सरपंच रोहिदासशेठ राक्षे, शिवसेना अल्पसंख्याक संघटक अध्यक्ष दीपक कांबळे, हिरामणशेठ बोंबले, चेअरमन दत्ताभाऊ सातपुते, सरपंच शशीभाऊ काळे, ज्येष्ठ नेते पांडुरंग बाप्पु गोरे, उपविभागप्रमुख राहुल मलघे, प्रकाशभाऊ सातपुते, संतोषभाऊ पानसरे, उपतालुकाप्रमुख संदीप गाडे, मा.ग्रामपंचायत सदस्य श्रीपती होले, रामशेठ ढोरे, शिवसेना नेते अरुण होले तसेच शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.