Top Public News
 Advertisement

 International

भाविकांची लुटमार थांबणार कधी? काल दिनांक 25/ 12 /2023 रोजी ग्राहक रक्षक समिती महाराष्ट्र

News Reporter   26-12-2023 21:04:01   242

Top Public News pune 

भाविकांची लुटमार थांबणार कधी?

काल दिनांक 25 /12 /2023 रोजी ग्राहक रक्षक समिती महाराष्ट्र प्रदेशच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सौ प्रतिभाताई पाटील; महाराष्ट्र संपर्कप्रमुख योगेश भाऊ देशमुख; पुणे शहर संघटक नरेश टाटिया; टॉप पब्लिक न्यूज च्या पुणे पत्रकार सौ कावेरी ताई देशमुख तसेच शरणागत सर आणि सहकारी यांचे बरोबर सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला जाण्याचा योग आला; आणि तिथे गेल्यावर इतका वाईट अनुभव ग्राहक रक्षक समिती महाराष्ट्र राज्य आणि टॉप पब्लिक न्यूज च्या सभासदांना आला; जर पदावरील व्यक्तींना पत्रकारांना असा अनुभव येत असेल तर सर्वसामान्य नागरिकांना भक्तांना किती मनस्ताप होत असेल याची कल्पनाच केलेली बरी

साधारण अकरा वाजण्याच्या सुमारास ग्राहक रक्षक समितीची टीम सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी गडावर पोहोचली आणि इथूनच लुटमारीचे प्रयोग चालू झाले; ग्राहक रक्षक समिती ची गाडी सर्वप्रथम स्थानिक दुकानदारांनी अडवली आणि गाडी आमच्या इथेच पार्किंगला लावा अशी गळ घालू लागले हो ना करता एके ठिकाणी गाडी पार्किंगला लावली गाडी लावेपर्यंत बेकायदेशीर पार्किंगच्या मालकाने खूप साखर पेरणी केली गाडी पार्क करून खाली उतरतात ओटी भरण्याचे सामान आता इथूनच घ्यावे लागेल अशी जबरदस्ती करू लागले त्यांना ओटी भरण्याची सामानाचे दर विचारले असता कमीत कमी पाचशे एक पासून पंधराशे एक पर्यंत आहे आणि सामान घेतल्याशिवाय बाहेर जाऊ देणार नाही अशी दादागिरी ची भाषा वापरू लागले; त्यांना ग्राहक रक्षक समितीच्या टीमने सांगितले की ओटी भरवायचे सामान आम्ही नाशिक वरून आणले आहे हे ऐकल्यावर तर दुकानदार रागाने लालबुंद होऊन शिव्या देऊ लागला तर त्याचे कुटुंबीय आई वडील पत्नी भाऊ हे सर्व ग्राहक रक्षक समितीच्या पदाधिकारी यांचे वर धावून गेले त्यांनी पदाधिकाऱ्यांना मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला त्यांना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपले ओळखपत्र दाखवले असता समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिथे गाडी पार्किंग केली होती त्या दुकानदाराने सांगितले की तुमच्या सारखे रोज शेकडो येतात आमची कोठेही तक्रार केली तरी आमचे आजपर्यंत कोणीही काहीही केलेले नाही आणि करणार सुद्धा नाही तुम्ही सुद्धा काहीही करू शकणार नाही कोणाकडे तक्रार करायची करा आमचं काही वाकड होत नाही आम्ही इथे स्थानिक असून कोणीही आमचे नादी लागत नाही

सदर प्रकार घडल्यानंतर ग्राहक रक्षक समितीचे पदाधिकारी सप्तशृंगी मातेच्या मंदिर प्रशासक यांचे कडे गेले परंतु तिथे विश्वस्तापैकी कोणाची भेट झाली नाही मात्र तेथील o s श्री प्रकाश जोशी यांचे कडे लेखी तक्रार दिली त्यांनी खूप मोलाचे सहकार्य केले आणि आमच्या लेखी तक्रारीची दखल घेत त्यांनी कळवण पोलीस स्टेशनला कळवली घटना कळवल्यानंतर पोलीस नाईक शिंदे आणि शेवाळे हे दोघेही दहा मिनिटात किती हजार झाले त्यांनी सुद्धा चांगले सहकार्य केले त्यांना सुद्धा लेखी तक्रार दिली त्या दोघांनी अर्ध्या तासाचा चौकशी चालू करून सदर दुकानदारास पोलीस स्टेशनला हजर होण्यास सांगितले

वरील सर्व प्रकार घडत असताना बाहेरगावावरून आलेल्या अनेक भक्तांनी सुद्धा त्यांना गडावरील दुकानात आलेले वाईट अनुभव सांगितले आणि लेखी तक्रार सुद्धा ग्राहक रक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे देऊन वरील गुंडांचा आपल्या ग्राहक रक्षक समितीच्या माध्यमातून योग्य तो बंदोबस्त करावा आणि या गुंडांच्या दादागिरीतून सप्तशृंगी गड मुक्त करावा अशी मागणी केली

तेथील दुकानदार बेकायदेशीर पार्किंग आणि प्रसादाचे दुकान लावतात ती जागावर खात्याची असल्याचे समजते. ग्रामपंचायतीने सुद्धा वरील गोष्टीत लक्ष घालावे अशी मागणी अनेक देवी भक्तांनी केली पार्किंग आणि प्रसादाचे दुकान लावलेले अनेक दुकानदार किंवा त्यांचे कामगार दिवसा मद्यपान करून भाविकांवरती दादागिरी जबरदस्ती करतात अशी तक्रार अनेक भाविकांनी केलेली आहे आणि त्याचा प्रत्यय ग्राहक रक्षक समितीला सुद्धा आली आहे कारण त्यांच्याबरोबर ज्या दुकानदाराने गैरवर्तन केले त्यांचा कामगार सुद्धा पूर्णपणे मध्याच्या अंमलाखाली होता

एक तर वन खात्याची बेकायदेशीर जागा वापरत आहेत त्याच्याकडे कायदेशीर कुढलेच लायन्स नाही बेकायदेशीर दुकान चालवायची आणि भक्तांवर दादागिरी करायची याची दखल तेथील ग्रामपंचायत पोलीस खाते घेईल का? वरील सर्व घटना ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर सौ आशाताई पाटील यांना समजल्यावर त्यांनी सदर घटना गंभीरपणे घेतली आणि लवकरच त्या गडावरील पोलीस प्रशासन ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांना भेटून कायदेशीर तक्रार करण्यात असल्याचे सांगितले

सदरच्या प्रकरणात ग्राहक रक्षक समितीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रणरागिनी खानदेश भूषण सौ प्रतिभाताई पाटील यांनी खूप खंबीरपणे त्या सर्वांचा मुकाबला केला

ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर सौ आशाताई पाटील आणि ज्याना तिथे गडावर वाईट अनुभव आले अशा सर्वांनी वैयक्तिक आणि फोनवरून प्रतिभाताई पाटील यांचे खूप कौतुक केले

सप्तशृंगी गडावरील पोलीस प्रशासन येथील ग्रामपंचायत समिती आणि वनमंत्री यांना ग्राहक रक्षक समिती आणि टॉप पब्लिक न्यूज च्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की तेथे चालू असलेली गुंडागर्दी दादागिरी थांबवून भक्तांना मोकळ्या वातावरणात देवीचे दर्शन मिळावे वरील प्रकरणामुळे देवीचे गडाचे नावाला सुद्धा काळीमा लागत आहे याची आपण नोंद घेऊन योग्य ती कारवाई करावी

या घडलेल्या प्रकरणाची दखल ग्रामपंचायत पोलीस प्रशासन वन विभाग यांनी घेऊन गडावर योग्य ती खबरदारी घेण्यास सर्व पार्किंग व्यवस्थापक आणि पूजा साहित्य विक्रेते यांना समज द्यावी एखाद्या दिवशी खूप मोठा अनर्थ गडावर घडण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही वरील गुंडांपासून सप्तशृंगी गडाला सप्तशृंगी मातेला तेथे येणाऱ्या भक्तांना वाचवण्याचे काम ग्रामपंचायत पोलीस प्रशासन यांनी करावी हेच भक्तांची मागणी आहे

पाहूया आता प्रशासन ग्रामपंचायत वनखाते काय कारवाई करते ते पाहू?

टॉप पब्लिक न्यूज रिपोर्टर दौंड नरेश टटिय






 News Videos
 Advertisement