Top Public News
 Advertisement

 National

भारतीय पत्रकार संघाच्या दौंड तालुक्याची सर्वसाधारण सभा

News Reporter   26-12-2023 12:18:46   324

Top Public News pune 

Pratibha Patil 

भारतीय पत्रकार संघाच्या दौंड तालुक्याची सर्वसाधारण सभा उत्साहात 

पुणे प्रतिनिधी-

 भारतीय पत्रकार संघाच्या दौंड तालुक्याची सर्वसाधारण सभा तसेच ओळखपत्र वाटपाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

यावेळी पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष सिकंदर नदाफ पुणे जिल्हाध्यक्ष तैनूर शेख जिल्हा सचिव काशिनाथ पिंगळे कार्याध्यक्ष राजेंद्र सोनवलकर तसेच जिल्हा प्रवक्ते प्रा. दिनेश पवार संघटक रवींद्र देसाई आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दौंड तालुका तसेच शहर कार्यकारिणी सदस्यांच्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला तर आगामी काळात पत्रकारांच्या आरोग्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रमांचा संकल्प देखील करण्यात आला.

या दरम्यान विविध मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले असून लवकरच पत्रकारांसाठी कार्यशाळा आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर तसेच पुण्यामध्ये पत्रकारांसाठी अधिवेशन भरविण्याचा महत्वपूर्ण निर्णय या सभेत घेण्यात आला.

या प्रसंगी भारतीय पत्रकार संघाचे दौंड तालुक्याचे उपाध्यक्ष पांडुरंग गडेकर यांसह सदाशिव रणदिवे सुदाम फाजगे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय पत्रकार संघ दौंडचे तालुकाध्यक्ष सुभाष कदम यांनी केले तर उपस्थितांचे आभार तालुका सचिव सुरेश बागल यांनी मानले.

टाॅप पब्लिक न्युज  पुणे






 News Videos
 Advertisement