Top Public News
 Advertisement

 International

परीक्षा शुल्क माफ करण्यासाठी शासनाने काढला जीआर मात्र विद्यापीठाने त्याला दाखवली केराची टोपली.*

News Reporter   23-12-2023 14:29:35   2995

Top Public News 

परीक्षा शुल्क माफ करण्यासाठी शासनाने काढला जीआर मात्र विद्यापीठाने त्याला दाखवली केराची टोपली.

 

प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुंना स्टूडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया ने  महाराष्ट्रात तयार झालेली दुष्काळजन्य परिस्थिति लक्षात घेता शैक्षणिक शुल्क माफीची मागणी केली. महाराष्ट्र शासनाने, महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक: एससीवाय -2023/प्र.क्र.37/म-7 निर्णय घेतला व सवलती लागु केल्या. राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्यांमधील 1021 महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिति घोषीत करुन सवलती लागू करण्याबाबत शासनाने हा जीआर  10 नोव्हेंबर 2023 रोजी काढला आहे. या जिआर मध्ये मराठवाड्यातील बहुतांश महसूल मंडळे असून या जीआर मध्ये शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी देण्यासंबंधी तरतूद असतांना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने या जीआरला केराची टोपली दाखवली आहे. स्टूडंट्स फेडरेशन ऑफइंडिया ने 08 डिसेंबर 2023 रोजी कुलगुरु प्रमोद येवले यांना परीक्षा शुल्क माफी संबंधात निवेदन देऊन शासन निर्णयाची आठवण करुन दिली होती,                 

टाॅप पब्लिक न्युज 

रिपोर्टर: अपर्णा गोरे






 News Videos
 Advertisement