Top Public News pune
================
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया च्या वतीने समता संघर्ष प्रेरणा भूमी Y कॉर्नर येथे *संविधान दिनानिमित्त दिनांक 26/11/2023 रोजी सयंकाळी ठीक 5.30 वाजता संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन घेण्यात आले. या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून
कॉम्रेड, रमेश जोशी उपस्थित होते या प्रसंगी बोलतांनी त्यांनी संविधानिक मुल्यांचे महत्त्व सांगितले. आज संविधानिक मुल्यांकडे सरकारांचे दुर्लश्र होत आहे हे आपण पहात आहोत. भारतातील प्रत्येक व्यक्तिचे हे कर्तव्य आहे की त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही मुल्य जोपासावी व त्याचा प्रसार करावा. भारतीय संविधानात नमुद असलेला सामाजिक, आर्थिक, राजकीय, न्याय प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येक व्यक्तिने प्रयत्नशील असले पाहिजे असे मत कॉम्रेड रमेश जोशी यांनी मांडले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक पल्लवी बोराडकर यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एस.एफ. आय विद्यापीठ अध्यक्ष अरुण मते यांनी केले. टाॅप पब्लिक संभाजीनगर न्यूज रिपोर्टर:अपर्णा गोरे