Top Public News pune Pratibha
≈====================
स्वच्छता अभियान म्हणजे नक्की काय? स्वच्छता अभियान म्हणजे नक्की काय? फक्त रस्त्यावरचा कचरा काढणे म्हणजे स्वच्छता नव्हे. पहिला मुद्धा म्हणजे गुटका किंवा तंबाखू खाऊन रस्त्यावर थुकणे. दुसरा महत्वाचा मुद्धा म्हणजे पुरुष कुठे ही रस्त्यावर, भिंतीवर लघवी करतो. ह्याला सरकार ने बंदी आणली पाहिजे. त्यांना दंड केले पाहिजे. कुठेतरी ह्यांना नियंत्रण आणले पाहिजे. विदेशात असं कधी आढळणार नाही. ही खरी स्वच्छता. जिथे पोललुशन होत नाही, इन्फेकशन होत नाही. खरंच सरकार ने ह्या विषायावर लक्ष देणे. तसा बघायला गेला तर प्रत्येक पुरुषाची जवाबदारी बनते के त्याने शौचाल्यात जावे. ठीक ठिकाणे शोचाल्या आहेत त्याचा उपयोग करावा जिथे नसतील तिथे नागरिकांनी तक्रार करावी. प्रत्येकाला नागरिकाला हा हक्क आहे. प्रत्येक पुरुषांनी ही भावना आणली पाहिजे की ही नगरी हा देश आपला आहे आणि आपण ते स्वच्छ ठेवलं पाहिजे. तेव्हा ही नगरी हा देश स्वच्छ राहील व स्वच्छता अभियान ही खऱ्या रीतीने साकार होइल. नक्कीच महानगरपालिके ने आणि सरकारणे ह्यात लक्ष घालावे ही विनंती.
टाॅप पब्लिक न्युज रिपोर्टर शर्मिला पिल्ले