Top Public News
 Advertisement

 भावपूर्ण श्रद्धांजली

आमदारांची तिरडी बांधली’ संजय राऊतांच्या टीकेला शिंदे गटाचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘स्मशानात जायला…’*

News Reporter   22-09-2023 17:24:58   19078

Top Public News pune 

*Shivsena Ramdas Kadam On Thackeray Group | ’16 आमदारांची तिरडी बांधली’ संजय राऊतांच्या टीकेला शिंदे गटाचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘स्मशानात जायला…’*

*टॉप पब्लिक न्यूज*– Shivsena Ramdas Kadam On Thackeray Group | एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे पिता-पुत्राचा एकेरी उल्लेख करत जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच ‘मुख्यमंत्र्यांसह 16 आमदारांची राजकीय तिरडी बांधली असून फक्त हे राम म्हणायचं बाकी आहे’ अशी टीका खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी केली होती. या टीकेवरुन रामदास कदम यांनी राऊतांना लक्ष केलं. 

*काय म्हणाले संजय राऊत.?*

 

ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी काल (गुरुवार) पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे गटाची तिरडी बांधल्याचे विधान केलं होतं. एकनाथ शिंदे आणि त्यांचे 16 आमदार अपात्र ठरतील याविषयी कुणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही. मुख्यमंत्र्यांसह 16 आमदारांची तिरडी बांधली आहे. ही राजकीय तिरडी आहे. आता फक्त हे राम म्हणायचं बाकी आहे. हे मी स्पष्टपणे सांगतो. मुडद्यात कितीही जीव फुंकण्याचा प्रयत्न केला, तरी शेवटी विज्ञान आणि कायदा यालाही मर्यादा आहेत, असं संजय राऊत म्हणाले. 

 

*रामदास कदमांचा हल्लाबोल*

 

संजय राऊतांच्या टीकेला रामदास कदम यांनी माध्यमांशी बोलताना खोचक शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. कुणाला राजकीय दृष्ट्या कायमचं स्मशनात जायला लागेल याचं दूध का दूध, पानी का पानी होईलच. निवडणूक आयोगानं शिवसेना कुणाची यावर शिक्कामोर्तब केलं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर बसल्यापासून संजय राऊतांची पोपटपंची सुरु आहे. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. तुम्ही फक्त प्रसिद्धी मिळवताय. यापेक्षा जास्त काय आहे तुमचं? तुम्ही फक्त देव पाण्यात ठेवून बसला आहात, असं रामदास कदम यांनी म्हटलं.

बाप-लेक दोघंही पळतायत

 

यावेळी बोलताना रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. आदित्य ठाकरेंवर मी बोलणं योग्य होणार नाही. उद्धव ठाकरेंवर बोलेन मी. आदित्य ठाकरेंची एवढी उंची नाही की मी त्यांच्यावर बोलावं. आदित्यसाहेब आणि त्यांचा बाप आमदार, खासदार, मंत्री, सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भेटही घेत नव्हते. पण आता एकनाथ शिंदेंनी त्यांना असं कामाला लावलंय की बापही पळतोय आणि बेटाही पळतोय, अशा एकेरी शब्दात रामदास कदमांनी ठाकरे पिता-पुत्रावर हल्लाबोल केला.

*टॉप पब्लिक न्यूज रिपोर्टर-: प्रशांत बेलोसे*






 News Videos
 Advertisement