टॉप पब्लिक न्यूज च्या सर्वेसर्वा, सूर्योदय सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या प्रमुख सौ. प्रतिभाताई पाटील तसेच सूर्योदय असंघटित कामगार संघटनेच्या खेड शिवापुर चे अध्यक्ष सौ. अलकाताई पिंगळे यांच्याबरोबर खेड शिवापूरच्या दर्गाजवळ गरजवंतांची विचारपूस करीत असताना अचानक त्यांना राधिका नावाची गरजू भगिनी त्यांच्या नजरेस पडल्या.
दोन महिन्यापूर्वी सौ प्रतिभाताई पाटील,. सौ. अलकाताई पिंगळे आणि श्री राजेन्द्रजी संचेती यांनी कुबड्या, चादर, आणि पावसापासून बचावासाठी छत्री इत्यादी अनेक वस्तू भेट दिल्या होत्या.
आज राधिकास विचारले की तुला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे गरज आहे तर राधिकाने मला व्हीलचेअर ची गरज आहे असे सौ. प्रतिभाताई पाटील यांना सांगितले असता त्यांनी सदरची व्हीलचेयर सुद्धा लवकरात लवकर आणून देतो असे सांगितले, ते ऐकल्यानंतर राधिकाला तर खूपच आनंद झाला आणि तिने सर्वांचे आभार मानले.
ईश्वर करो आणि राधिकाची व्हीलचेयरवर बसण्याची इच्छा लवकरात लवकर गणपती बाप्पा ने पूर्ण करावी हीच श्रीचरणी प्रार्थना.
टॉप पब्लिक न्यूज साठी,
नरेश टाटिया, दौंड.