टॉप पब्लिक न्यूज
याची प्रचिती विजय बळीराम कांबळे. राहणार कोंढवा बुद्रुक यांनी याची देही याची डोळे घेतली, घडलेली घटना पुढील प्रमाणे.
ही काही फिल्मी कथा नाही, ही आहे एक सत्य घटना.
दिनांक १९/५/२०२५ रोजी महाराष्ट्र असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष, टॉप पब्लिक न्यूज च्या सर्वेसर्वा, खानदेश कन्या, दीनदुबळ्यांचे कैवारी, सौ. प्रतिभाताई पाटील यांना मुंबईहून एक अनोळखी मुलाचा फोन येतो, तो सौ. प्रतिभाताई पाटील यांना सांगतो की, मी कोंडवा येथे राहत असून, माझ्या आईला कॅन्सर सारखा दुर्धर आजार झाला असून मी ५ ते ६ दिवसापासून माझ्या लहान बहिणी सह आईच्या उपचारासाठी मुंबईच्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आलो असून, जवळचे सर्व पैसे जेवण व उपचार करण्यात खर्च झाले आहे.
मी गेल्या ५/६ दिवसापासून एक हॉटेलमध्ये उधारीवरच चहापाणी जेवण करत होतो पण आज हॉटेल वाल्याने सुद्धा चहापाणी व जेवण उधार देणे बंद केले कारण माझे जेवणाचे व चहापाणीचे बिल साधारण २८००/०० रुपये इतके झाले असून माझ्याकडे आत्ता एकही रुपया नाही, परंतु मी व माझी धाकटी बहीण भुकेने खूप असावी झालो आहे परंतु काय करावे हे सुचेना जवळ तर एकही रुपया नाही, आता काय करावे या विचारात असतानाच मला कोंढवा मधील देवदूत सौ. प्रतिभाताई पाटील यांची आठवण आली आणि मी त्यांना फोन लावून माझी अडचण सांगितली, मी त्यांना कधी प्रत्यक्ष पाहिले नव्हते मी त्यांना कधी भेटलो नव्हतो, त्यांनी सुद्धा मला कधी प्रत्यक्ष पाहिली नाही व भेटलो नाही पण एक साध्या फोन कॉलनी मी माझी आप बीती त्यांना कळविली आणि काय आश्चर्य पुढच्या पाच मिनिटातच हॉटेल वाल्याच्या मोबाईलवर फोन पे द्वारे मॅडमनी मला एकूण २८००/०० रुपयाची गरज असताना सुद्धा ३३००/०० रुपये पाठवले,
त्यातील २८००/०० हॉटेलचे बिल द्यायला सांगितले व ५००/०० रुपये त्यांनी मला किरकोळ खर्चासाठी पाठवले.
माझ्यासहित ते हॉटेल वाले सुद्धा आश्चर्यचकित झाले, ते अनोळखी देवदूत म्हणजेच सौ. प्रतिभाताई पाटील यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहे.
पण आज एक प्रचिती तिथे हजर असणाऱ्या सर्वांनाच आली ती म्हणजे
"या मतलबी दुनियात माणुसकी अजूनही जिवंत आहे"
त्या देवताला माझा त्रिवार सलाम.
टॉप पब्लिक न्यूज साठी,
नरेश टाटिया , दौंड.