टॉप पब्लिक न्यूज -:
पुणे- सर्वांना एकाच छताखाली स्थळे मिळून वेळ आणि पैशाची बचत व्हावी ह्या हेतूने *रविवार २५ मे* रोजी सकल मराठा समाज वधू वर परिचय मेळाव्याचे पुणे येथे आयोजन करण्यात आले असून मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
*रविवार दिनांक २५ मे* रोजी पुणे येथील वेदसभा हॉल, विश्व हॉटेल समोर, सारसबागेजवळ, सदाशिव पेठ येथे दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत मराठा समाज वधू वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला असून *आमदार शंकरभाऊ मांडेकर* यांच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार असून शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार विजेते *भिला पाटील* कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून *सर्वश्री शांतारामदादा इंगवले, सत्यवान उभे, बाबासाहेब कंधारे, दत्ता उभे, महादेव कोंढरे, के बी चौधरी, मधुकर घारे , अविनाश पाटील, शंकर पाटील, मोतीलाल पाटील, सुनिताताई लेकावळे, प्रतिभाताई पाटील, अलकाताई ववले, शिवाजी उभे, अकुंश उभे, किसन शिंदे, निवृत्ती उभे, दत्तात्रय उभे, राहुल गोविलकर*, इत्यादी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून अधिक माहितीसाठी मेळाव्याचे आयोजक अनिल काकडे यांना 8104211818 किंवा 9324552963 ह्या भ्रमण ध्वनी वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे
टॉप पब्लिक न्यूज रिपोर्टर -: सौ प्रतिभा ताई पाटील