बेघराला चादरीची उब, चालण्यासाठी काठीचा आधार, पोटाला दोन घास, आणि डोक्यावर छत्री,
याच गोष्टीची आज समाजात अनेकांना गरज आहे. आणि ही गरज पूर्ण केली आहे सूर्योदय असंघटित कामगार संघटनेने.
खेड शिवापूर येथील जगप्रसिद्ध दर्ग्यावर, राधिका पोखरे महिला अनेक दिवसापासून वरील सर्व गोष्टी पासून वंचित अशा अवस्थेत राहत होती,
सदर गोष्टीची कल्पना खेडशिवापूर येथील सूर्योदय असंघटित कामगार संघटना महिला अध्यक्ष सौ अलका पिगंळे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ताबडतोब सूर्योदय असंघटित कामगार संघटना राष्ट्रीय अध्यक्ष सौ. प्रतिभाताई पाटील यांच्या कानावर घातली.
सदर प्रसंग लक्षात आल्यानंतर सूर्योदय असंघटित कामगार संघटना राष्ट्रीय अध्यक्ष सौ प्रतिभाताई पाटील, टॉप पब्लिक न्यूज चे सहसंपादक श्री. राजेंद्रजी संचेती तसेच खेड शिवापुर चे माजी सरपंच श्री स्वप्निल कोंडे, ओंकार कडू, सामाजिक कार्यकर्ते सुधीर कासारे यांच्या उपस्थितीत सदर बेघर महिलेस सोलापुरी चादर, बिस्किटांचे पाकीट, चालण्यासाठी कुबड्या (काठया) आणि ऊन पावसापासून संरक्षणासाठी एक छत्री असा सर्व लागणारा वस्तू राधिका पोखरे यांना कायमस्वरूपी भेट स्वरूपात देण्यात आले.
शेवटी मानव सेवा हीच ईश्वरसेवा.
टॉप पब्लिक न्यूज साठी,
नरेश टाटिया, दौंड.