"भुके को अन्न,प्यासे को पानी",
यही है लोणावले की"भगवान महावीर की रोटी"की कहानी.
लोणावळा येथे "जैन नारीशक्ती"द्वारे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये", "महावीर की रोटी"हा उपक्रम सौ. मनीषा जी बांबोरी यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे.
सदरचा"महावीर की रोटी"वाटप कार्यक्रम रोज सकाळी अकरा वाजता लोणावळा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वरील ग्रुप तर्फे राबविला जातो. सुमारे 100 गरजू लोकांना जैन भाजी पोळीचे पॅकेट मोफत दिले जातात.
समाजात रोज कोणाचे तरी वाढदिवस, कोणाचे तरी लग्नाचे वाढदिवस, कोणाचा तरी स्मृतिदिन साजरा केला जातो, यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने हजारो रुपये वेगवेगळ्या कार्यक्रमात खर्च करतात, काही ठिकाणी वरील केलेला खर्च योग्य ठिकाणी मार्गी लागतो तर काही ठिकाणी अशा प्रकारे केलेला खर्च वायफाय जातो,
अशा शुभप्रसंगी केलेला खर्च वायफळ जाऊ नये म्हणून सौ मनीषा बांबोरी यांनी यांनी"महावीर की रोटी"ची संकल्पना आपल्या महिला ग्रुप समोर मांडली आणि महिला ग्रुप नि त्यात लगेचच मंजुरी दिली.
सदरचा उपक्रम दिनांक ११/४/२०२५ रोजी महावीर जन्म कल्याणक या दिवसापासून आजपर्यंत अविरत चालू असून भविष्यात सुद्धा हा उपक्रम अविरतच चालू राहील याची खात्री"
"जैन नारीशक्ती"लोणावळा ग्रुप यांनी दिली आहे.
ज्या कोणाचे वाढदिवस, लग्नाच्या वाढदिवस, स्मृतिदिन असतील त्या व्यक्ती वरील ग्रुपला 2000/रुपये देऊन या कार्यक्रमास हातभार लावतात.
सुरुवातीला हा ग्रुप फक्त जैन समाजाच्या बंधू-भगिनींच्या सहकार्याने चालला, पण नंतर या उपक्रमात अनेक जैने तर दानवीर, दानशूर पुढे यायला लागले आहे,
आणि विशेष म्हणजे व्हाट्सअप ग्रुप तर्फे या"जैन नारीशक्ती"या ग्रुपचा बोलबाला परदेशात सुद्धा होऊ लागल्याने , परदेशातून सुद्धा सदरच्या उपक्रमाला देणगी यायला चालू झाले आहे.
याप्रसंगी सदर ग्रुपची संकल्पना ज्यांच्या मनात आली त्या सौ. मनीषा जी आणि महिला ग्रुप ने सांगितले की आत्तापर्यंत ज्या, ज्या दानशोरांनी आमच्या"जैन नारीशक्ती"लोणावळा या ग्रुपला"महावीर की रोटी"या उपक्रमासाठी हातभार लावला त्या सर्वांचे मनापासून आभार.
यापुढे सुद्धा ज्या कोणा दानशूर , दानवीर व्यक्तींना या उपक्रमात भाग घ्यायचा असेल त्यांनी सौ. मनीषा बांबोरी यांच्या मोबाईलवर संपर्क साधून सेवा करावयाची संधी द्यावी ही नम्र विनंती.
सौ. मनीषा यांचा मोबाईल नंबर 9370660120 हा आहे.
टॉप पब्लिक न्यूज साठी,
नरेश टाटिया.