"केलेल्या समाज हितकार्याचे दखल घेऊन कौतुक".
काल दिनांक ४/५/२०२५ ओबीसी/ व्ही जे एन टी. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय बाळासाहेब जी किसवे यांचा पुणे शहर दौरा दुपारी बारा वाजता शिवसेना (शिंदे गट) मध्यवर्ती कार्यालय, येते मोठ्या उत्साहात पार पडला.
सदर कार्यक्रमाच्या वेळी महाराष्ट्र संघटित कामगार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सौ . प्रतिभाताई पाटील यांनी त्यांची भेट घेऊन, आपण आजपर्यंत केलेल्या समाजकार्याची फाईल श्री. बाळासाहेब किसवे यांना दिली असता, माननीय बाळासाहेब किसवे यांनी सौ. प्रतिभा पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन समाधान व्यक्त करून त्यांच्या कामाचे कौतुक केले.
नंतर त्यांनी महाराष्ट्र असंघटित कामगार संघटनेला रुग्णवायचा देण्याचा मनोदय व्यक्त केला, व तसा शब्द महाराष्ट्र असंघटित कामगार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष सौ. प्रतिभाताई पाटील यांना दिला.
सदर कार्यक्रमास ( शिंदे गट) शिवसेना ओबीसी/व्ही जे एन टी पुणे जिल्हाप्रमुख, पुणे जिल्हा उपसंघटक श्री पंकज शिवाजीराव कोद्रे यांचे सह महाराष्ट्र असंघटित कामगार संघटने महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सौ प्रतिभाताई पाटील, टॉप पब्लिक न्यूज चे सहसंपादक
श्री. राजेंद्रजी संचेती, यांचे सह (शिंदे गट) शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर प्रसंगी महाराष्ट्र असंघटित कामगार संघटनेच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष सौ प्रतिभा पाटील यांनी संघटनेला रुग्णवाहिका देण्याचा आश्वासन दिल्याबद्दल माननीय बाळासाहेब किसवे यांचे आभार मानले.
टॉप पब्लिक न्यूज साठी,
नरेश टाटिया दौंड.