Naresh Tathiya 01-05-2025 12:45:33 29
अक्षय तृतीयाचे औचित्य साधून आणि आपले स्फूर्ती स्थान असणारे आई-वडील यांच्या आठवणी जिवंत राहण्यासाठी, सूर्योदय प्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष सौ. प्रतिभाताई पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी खेड शिवापुर दर्गा येथील बेघर व अनाथांना जेवणाच्या स्टीलच्या ताटाचे वाटप केले. आज अक्षय तृतीयेच्या शुभ दिनी आपल्याला दान रूपात का होईना एका माऊलीने स्टीलचे ताट जेवणासाठी भेट दिल्याबद्दल सर्वांनी सौ. प्रतिभाताई पाटील, टॉप पब्लिक न्यूज चे सहसंपादक श्री. राजेंद्रजी संचेती, तसेच सूर्योदय असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष सौ. अलकाताई पिंगळे यांच्या बरोबरच संघटनेच्या सभासदांचे आभार मानून आशीर्वाद दिले. प्रेमाने आणि ममतेने विचारपूस केल्यानंतर तीर्थ ताट जेवणासाठी भेट म्हणून मिळाल्यावर तेथे असलेल्या अनाथ आणि बेगारांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक बघायला मिळाली. टॉप पब्लिक न्यूज साठी, नरेश टाटिया, दौंड.