टॉप पब्लिक न्यूज -: नागरी संरक्षण कायदा १९६८ केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार नागरी संरक्षण अस्तित्वात आलेली असून शांततेच्या काळात नागरिकांना प्रशिक्षण देणे सराव घेणे विविध प्रात्यक्षिके आयोजित करणे जनजागृती करणे हे राबविले जातात
जानेवारी २०२५ पासून मुंबई ठाणे व पुणे या शहरातील संवेदनशील भागातील सोसायट्यातील नागरिकांना नागरी संरक्षण दलाच्या अग्निशमन कार्यक्रमातील प्रशिक्षणाचा उपयोग करून फायर ड्रील मौक ड्रील व प्रथमपचार कार्यक्रम नागरी संरक्षण स्वयंसेवकाच्या मदतीने शहरातील विविध गृहनिर्माण संस्थांमध्ये राबविली जेणेकरून मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्ती मध्ये प्राथमिक स्तरावर नागरिकांनी नागरिकांचे संरक्षण करता आले पाहिजे
तरी आपल्या सोसायटीतील सभासद महिला कर्मचारी आणि विद्यार्थी ,सुरक्षक ,स्वच्छता कर्मचारी यांना नागरी संरक्षण दलाचे महत्वाचे प्रशिक्षण घ्यावे असा प्रशासनाचा आग्रह आहे
हे प्रशिक्षण आयोजित करणे कामी या कार्यालयाचे उप नियंत्रक लेफ्ट कर्नल श्री. प्रशांत चतुर , सहाय्यक उप नियंत्रक श्री. अर्जुन कुऱ्हाडे तसेच विभागीय अधिकारी श्री. योगेश परदेशी व ना. स. दलाचे उपस्तीत अधिकारी स्वयांसेवक व न्यू अजंटा सोसायटीचे सर्व पदाधिकारी, सभासद, सुरक्षा रक्षक , स्वच्छता कर्मचारी यांचे सहकार्य लाभले
टॉप पब्लिक न्यूज रिपोर्टर - सौ प्रतिभा ताई पाटील