टॉप पब्लिक न्यूज -: "तमिळ नववर्षाचे औचित्य साधून, खानदेश कन्येचा तामिळ समाजाकडून भव्य सत्कार.
तामिळ नववर्षाचे (पुणे) स्वागत दिनांक १९/४/२०२५ रोजी पुणे येथे मोठ्या प्रमाणात करण्यात आले.
या तामिळ नववर्षाच्या दिनी तमिळ कल्याणकारी संघटना पाईन, समितीतर्फे समाज बांधवांसाठी महात्मा फुले सांस्कृतिक भवन, वानवडी येथे एक भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमास श्री. सी एन. रविशंकर, वरिष्ठ उपाध्यक्ष, आश्रा कन्सल्टन्स प्रा. लि. जूनियर सेक्रेटरी एस वि युनियन ट्रस्ट, सेक्रेटरी श्री हरिहर भजना समाजम, उपाध्यक्ष पुणे जिल्हा श्री. सबरीमलाई अय्यप्पा सेवा संगम. हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात सूर्योदय असंघटित कामगार संघटना राष्ट्रीय अध्यक्ष, टॉप पब्लिक न्यूज च्या सर्वेसर्वा, शेकडो पारितोषिक विजेत्या, कुष्ठरोग्यांचे श्रद्धास्थान सौ. प्रतिभाताई पाटील यांचा तामिळ संघाच्या वतीने, सौ प्रतिभाताई पाटील यांनी आत्तापर्यंत केलेल्या कामाची दखल घेऊन पुणेरी पगडी आणि चाल देऊन सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमास आनंदराज म्युझिकल ग्रुप आणि इव्हेंट मॅनेजमेंट कडून संगीतमय गाण्यांची मैफिल सादर करण्यात आली.
कार्यक्रमानंतर कार्यक्रमास आलेल्या सर्व बंधू भगिनींना खास दक्षिणात्य जेवणाच्या पदार्थाची व्यवस्था करण्यात आली होती.
सरते शेवटी उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
टॉप पब्लिक न्यूज साठी,
नरेश टाटिया दौंड.