पुण्याच्या महर्षी नगर मध्ये राहणारे,
जैन समाजाच्या सर्व कार्यक्रमात हिरारीने भाग घेणारे जैन समाजाचे एक व्यक्तिमत्त्व म्हणजे , नामांकित पापडचे उत्पादक श्री राजेंद्र संचेती यांची नावाजलेल्या टॉप पब्लिक न्यूज च्या सहसंपादक पदी निवड करण्यात आली.
सदर निवडीचे नियुक्तीपत्र आंबेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री शरद जिने यांच्या हस्ते देण्यात आले. सदर नियुक्तीपत्र देताना टॉप पब्लिक न्यूज च्या मुख्य संपादिका सौ. प्रतिभा ताई पाटील या सुद्धा उपस्थित होत्या.
अशा व्यक्तीची टॉप पब्लिक न्यूज च्या सहसंपादक पदी नियुक्ती झाल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.
टॉप पब्लिक न्यूज च्या ग्रुप तर्फे सुद्धा त्यांचे हार्दिक अभिनंदन.
टॉप पब्लिक न्यूज साठी, नरेश टाटिया, दौंड.