Prashant belose 18-04-2025 02:21:54 24
टॉप पब्लिक न्यूज : चोरीच्या अनेक विचित्र घटना घडतात. अनेक वेळा चोरटेही त्यांच्या मजेशीर कृतीमुळे प्रसिद्ध होतात, अशाच एका घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली होती. बनावट बंदुक घेऊन पुण्यात झालेली चोरी चांगलीच गाजली. अखेर या टोळीच्या मुसक्या पुणे पोलिसांनी 48 तासात आवळल्या आहेत. धायरी येथे नकली पिस्तुलचा धाक दाखवुन सराफास लुटणाऱ्या दोन आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
धायरी परिसरात सोन्याच्या दुकानात दरोडा टाकणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत श्री ज्वेलर्स या दुकानात आरोपींनी नकली पिस्तुलाचा धाक दाखवत 20 लाख रुपये किंमतीचे 22 तोळे वजनाचे सोन्याचे दागिन्यांची चोरी केली होतr. या प्रकरणी नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता . आरोपींना शोधण्यासाठी पुणे पोलिसांकडून १२ पथके नेमण्यात आली होती . राजेश ऊर्फ राजू चांगदेव गालफाडे (वय ४० वर्ष) , श्याम शेषेराव शिंदे (वय ३७ वर्ष ) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
टॉप पब्लिक न्यूज रिपोर्टर -: प्रशांत