हनुमान नगर येथे,
दरवर्षीप्रमाणे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
पद्मावती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय भाऊ दगडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
सदर कार्यक्रमास पद्मावती प्रतिष्ठानचे प्रमुख श्री विजय भाऊ दगडे, सोमनाथ आबा दगडे, महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष तसेच विविध संघटना आणि महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार प्राप्त सौ प्रतिभाताई पाटील, मोरे सर, तसेच समाजसेवक हेमंत काका मध्ये, यांच्यासह हनुमान नगरचे स्थानिक रहिवासी सुद्धा उपस्थित होते.
विजय भाऊ दगडे यांची तर्फे महाप्रसाद ठेवण्यात आला होता,
सदर कार्यक्रमाचा हनुमान नगरचे स्थानिक रहिवासी आणि शेकडो भाविकांनी लाभ घेतला.
टॉप पब्लिक न्यूज साठी,
नरेश टाटिया दौंड