Top Public News
 Advertisement

 Pune City

विनाहेल्मेट घराबाहेर पडताय !

Prashant Belose   25-01-2025 14:25:18   30

टॉप पब्लिक न्यूज -: पुणे शहर हे वाहतूक कोंडीत जगात चौथ्या क्रमांकावर असल्याची जगभर चर्चा होते. परंतु, त्याच वेळी पुण्यात दरवर्षी १० लाख पुणेकरांवर वाहतूक नियमांचा भंग केल्याचा दंड ठोठावला जातो. लोक अदालतीमार्फत हा दंड वसुल करण्याचा प्रयत्न केला जातो. तरी ५० टक्क्यांहून वाहनचालक न्यायालयीन नोटीसीलाही जुमानत नाही. त्यामुळेच गेल्या २ वर्षात ११ लाख पुणेकरांकडे वाहतूक दंडाची तब्बल १०४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसुल करण्यासाठी मोहिम राबविण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. त्यामुळे आता विना हेल्मेट घालून दुचाकीवर बाहेर पडलात किंवा वाहतूक नियम तोडला तर पोलीस पकडून तुमच्या गाडीवरील थकीत दंड वसुल करतील. तेव्हा नियमाने जा, असे म्हणायची वेळ आली आहे.

पुणे शहर पोलीस दलाच्या वतीने शहरात वाहतूक नियमभंग करणार्‍या १० लाखांहून अधिक वाहनांवर कारवाई केली जाते. २०२३ मध्ये १० लाख ११७ वाहनांवर ७७ कोटी ५६ लाख ९६ हजार २५० रुपये तर २०२४ मध्ये १० लाख ६३ हजार ४७६ वाहनांवर ८९ कोटी ९१ लाख ३ हजार ५५० रुपयांचा दंड ठोठावला आहे. दोन वर्षात मिळून तब्बल २० लाख ६३ हजार ५९३ वाहनांवर तब्बल १६७ कोटी ४७ लाख ९९ हजार ८०० रुपयांचा दंड करण्यात आला आहे. त्यापैकी वाहन चालकांनी ६३ कोटी ४५ लाख ७७ हजार रुपये दंड भरला आहे. अद्याप १०४ कोटी २ लाख २२ हजार ८०० रुपयांचा दंड पुणेकरांकडे थकीत आहे. हा दंड वसुलीकडे आता वाहतूक शाखा लक्ष केंद्रीत करणार आहे.

 

 

वाहतूक नियमभंगाकडे दुर्लक्ष

शहरात विना हेल्मेट दुचाकी चालविणारे प्रमाण मोठे आहे. चौका चौकात बसविलेल्या सीसीटीव्ही मार्फत अशा वाहनचालकांवर सर्वाधिक कारवाया केल्या जातात. झेब्रा कॉसिंगवर वाहन उभे करणे, दुचाकीला आरसा नसणे अशा वाहनांवरही कारवाई केली जाते. त्याची पावती वाहन ज्याच्या नावावर आहे, त्याच्या मोबाईलवर जात असते. परंतु, अनेक वाहनचालक त्याकडे दुर्लक्ष करतात. मग कधीतरी वाहतूक पोलिसांनी पकडल्यावर त्यांच्या वाहनांवरील दंडाची रक्कम ऐकल्यावर त्यांना चक्कर येण्याची बाकी असते. वाहतूक नियमभंगाकडे दुर्लक्ष केल्यानेच त्यांनी स्वत:हून हे ओढवून घेतलेले असते.

वाहतूक शाखेने २०२३ पेक्षा २०२४ मध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह, राँग साईड ड्रायव्हिंग, ट्रिपल सीट, रॅश ड्रायव्हिंग यावर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे.

 

वाहतूक नियमभंगाची कारवाई

चलन -: २०२३ २०२४
एकूण चलन -:  १०००११७ १०६३४७६
एकूण दंड -: ७७५६९६२५० ८९९१०३५५०
पेड चलन -: ४७८८३५ ४५१३३८
पेड दंड -: ३३२८१३६०० ३०१७६३४००
अनपेड चलन -: ५२१२८२ ६१२१३८
अनपेड दंड -: ४४२८८२६५० ५९७३४०१५

टॉप पब्लिक न्यूज रिपोर्टर -: प्रशांत






 News Videos
 Advertisement