टॉप पब्लिक न्यूज -: दिनांक २३.०१.२०२५ रोजी आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ या निमित्ताने व मकर संक्रांती निमित्त लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या.सोलापूर.शाखा मांजरी येथे हळदी कुंकूवाचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी आपल्या पतसंस्थेचे सल्लागार श्रीमती सुलभाताई साळुंखे, सौ. संगीताताई लुगडे, सौ. कविताताई घुले,सौ मंगल ताई जगदाळे तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन प्रतिभाताई पाटील व सुनंदा ताई जाधव उपस्थित होत्या.या कार्यक्रमच्या प्रमुख पाहुण्या प्रतिभाताई सुर्योदय प्रतिष्ठ ,सुर्योदय असंघटित कामगार संघटना राष्ट्रीय अध्यक्ष ,टॉप पब्लिक न्यूज मुख्य संपादक सौ.प्रतिभाताई पाटील महिलांनी सकारात्मक कसे राहावे या विषयी मार्गदर्शन केले तर दुसर्या प्रमुख पाहुण्या सुनंदा ताई यांनी महिला सबलीकरण याविषयी मार्गदर्शन केले शाखेच्या सल्लागार सुलभाताई यांनी लोकमंगल समुह बद्दल माहिती व पतसंस्थेची महिला सन्मान आवर्तक ठेव योजना तसेच विविध योजनांची माहिती सांगितली व उपस्थित महिलांना पैशाची बचत कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. सल्लागार संगीता ताई लुगडे व कविता ताई घुले यांनी कार्यक्रमाचे योग्य नियोजन केले माया घुले यांनी सूत्रसंचालन केले तर मनीषा सुर्यवंशी यांनी आभार प्रकट केले.मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाला विभागीय अधिकारी कमलाकर पाटील सर, तसेच कर्मचारी नितीन खैरे, महेश फुलझळके, गणेश पंके,सल्लागार मंडळ आणि महिला खातेदार उपस्थित होत्या.
टॉप पब्लिक न्यूज रिपोर्टर -: प्रशांत