टॉप पब्लिक न्यूज -: 🔸कष्टकऱ्यांचा बुलंद आवाज 🔸
सूर्योदय असंघटित कामगार संघटनेचा झटपट होणारा विस्तार पाहून, खेडशिवापूर येथील महिला अध्यक्ष सौ. अलका श्रीपाद* पिंगळे यांच्यासह सोळा कामगार भगिनींनी आज सूर्योदय असंघटित कामगार संघटना, महाराष्ट्र राज्याचे सभासद पद स्वीकारले.
*खेड शिवापूर येथे एक छोट्याशा* कार्यक्रमात *सूर्योदय असंघटित कामगार सेनेच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष सौ. प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते सोळा कामगार भगिनींना सभासद म्हणून संघटनेत सामावून घेण्यात आले* .
सदर कार्यक्रमास सूर्योदय असंघटित कामगार संघटनेच्या पुणे शहर महिला अध्यक्ष सौ. नम्रता शिंदे याही उपस्थित होत्या.
कार्यक्रमानंतर अनेक कामगार भगिनींनी संघटनेत सामील होण्याबाबत मनोदय व्यक्त केला.
*टॉप पब्लिक न्यूज साठी नरेश टाटिया दौंड.*