टाॅप पब्लिक न्यूज पुणेकर
🙏🏻संपूर्ण बातमी वाचा
रुपीनगर मधील अतिशय बिकट परिस्थिती ???
टॅक्स भरून सुद्धा नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित
!! जागो नागरिक जागो!!
गेल्या आठवड्यात रुपीनगर सरस्वती हाउसिंग सोसायटी ज्ञानदीप शाळेच्या मागे एक तरुणाचा भीषण अपघात झाला अतिशय गंभीर दुखापत होऊन तो थोडक्यात बचावला आहे
त्याचं कारण काही दिवसांपूर्वी सरस्वती हाऊसिंग सोसायटीमध्ये पाईपलाईनचे खोदकाम झाले होते पण या नालायक ठेकेदारांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अतिशय निष्कृट दर्जाचं काम फक्त टक्केवारीसाठी संगन मताने केले आणि अर्धवट सोडून निघून गेले पुन्हा फिरकले सुद्धा नाही रस्त्यावर खड्डे पडलेले माती सांडलेली अनेक वेळा अपघात होत होते कोणाचेही लक्ष नव्हतं पण कालचा अपघात हा फार भीषण होता त्याचे करून विद्यार्थ्यांचा कुटुंबाला आतापर्यंत दोन लाख रुपये खर्च झाला
या अपघाताची दखल घेत मी स्वतः संदीप भाऊ जाधव आणि सामाजिक कार्यकर्ते वृक्षप्रेमी सुखदेव नाना मस्के यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खड्डे बुजवण्याचा प्रस्ताव मांडला होता दोन दिवस त्यांनी आम्हाला सहकार्य सुद्धा केले रूपीनगर मधील बऱ्याच ठिकाणी आम्ही स्वतः उभे राहून खड्डे बुजवले पॅच मारून घेतले पण असेच जर अपघात होत असतील आणि आपल्या तरुण मुलांना ज्येष्ठांना महिलांना अपघाताला सामोरे जावे लागत असेल तर ही फार मोठी शोकांतिका आहे आज फ प्रभाग स्थापत्य मुख्याधिकारी विजयकुमार वाईकर यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना अपघाताचे फोटो दाखवून रुपीनगर मधील सरस्वती हाऊसिंग सोसायटी बल्लाळेश्वर हाऊसिंग सोसायटी इंद्रायणी हाऊसिंग सोसायटी आणि हमराज टेलर हनुमान हाउसिंग सोसायटी आणि करवीर हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी संपूर्ण नवीन डांबरी रस्त्याची आम्ही मागणी केली आहे
रस्त्यासोबत (पावसाचे सांडपाणी वाहून जण्याकरिता) स्ट्रॉंम वाटर लाईनची सुद्धा मागणी केली आहे
सोमवार पर्यंत प्रत्यक्ष अधिकाऱ्यांची विजिट होणार आहे
आणि उद्या एक गाडी खड्डे बुजवण्यासाठी आपल्या रुपीनगर एकता चौकातून ते रामेश्वर मंदिराच्या मागील बाजूस तसेच रुपी हाउसिंग सोसायटी येथे खड्डे बुजवण्याचे काम होणार आहे
नागरिकांनी याची नोंद घ्यावी तसेच नकळत नजर चुकीने आमच्याकडून कुठे खड्डे राहिले असतील तर आम्हाला सूचना करावी 🙏🏻🌸
तुमच्या हक्काचे सामाजिक कार्यकर्ते जनसेवक संदीप भाऊ जाधव आणि वृक्ष प्रेमी सुखदेव नाना मस्के
टाॅप पब्लिक न्यूज