Top Public News
 Advertisement

 Pune City

MIT पुणे शिक्षणसंस्था समूहाच्या "MIT स्कुल ऑफ गव्हर्नमेंट" अंतर्गत "MIT राष्ट्रीय सरपंच संसद" स्थापन करण्यात आली आहे.

News Reporter   20-02-2024 22:13:21   59

MIT पुणे शिक्षणसंस्था समूहाच्या "MIT स्कुल ऑफ गव्हर्नमेंट" अंतर्गत "MIT राष्ट्रीय सरपंच संसद" स्थापन करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील एकूण 34 ग्रामीण जिल्ह्यात "जिल्हा परिषद" व "राष्ट्रीय सरपंच संसद"यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक जिल्ह्यात प्रशासकीय अधिकारी-सरपंच-उपसरपंच-लोकप्र तिनिधी यांच्या सहभागाने "जिल्हा सरपंच संसद"चे आयोजन करण्यात येत आहे.

     सोलापूर जिल्हा सरपंच संसद आयोजन बाबतचे पत्र आज जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मा.मनीषाताई अव्हाळे यांना देण्यात आले.त्यांच्यावतीने हे पत्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा.ईशादिन शेळकंदे यांनी स्वीकारले.श्रीमती भक्तीताई जाधव-पुणे विभाग महिला समन्वयक,सौ.प्रगतीताई तिवारी-सोलापूर जिल्हा महिला समन्वयक,सौ.श्रद्धाताई अध्यापक सोलापूर जिल्हा महिला सहसमन्वयक,सौ.कांचनताई हन्नूरे-सोलापूर शहर महिला समन्वयक,सौ.प्रीतीताई जाधव-माढा शहर महिला समन्वयक,पत्रकार.श्री.कृष्णगिरी राजगिरी,मंगळवेढा तालुका लक्ष्मी दहिवडीचे सरपंच श्री.अनिल आबा यांच्या हस्ते हे पत्र त्यांनी स्वीकारले.

*श्रीमती भक्ती जाधव.पुणे विभाग महिला समन्वयक.राष्ट्रीय सरपंच संसद महाराष्ट्र राज्य*






 News Videos
 Advertisement