Top Public News
 Advertisement

 Pune City

छञपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

News Reporter   20-02-2024 12:54:53   79

 दि. 19 फेब्रुवारी 2024 रोजी जि प प्रा शा गूरूपिंपरी शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शालेय समितीचे अध्यक्ष श्री विनोद प्रल्हादराव कोल्हे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. शाळेच्या मुख्यध्यापक श्री लोढे सर व सर्व सहकारी शिक्षकांच्या संकल्पनेतून साकारलेल्या लेझीम पथकासह महाराजांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. गावातील श्री आसाराम दादा कोल्हे यांनी सर्व शिक्षकाचा सत्कार करण्यात आला त्यास उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.गावकऱ्यांनी व पालकांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे भरभरून कौतुक केले.💐🙏🏻






 News Videos
 Advertisement