महिपाल चौधरी (रा. साई पॅराडाईज सोसायटी. पुनावळे), राहुलकुमार राजदेवराम (रा. बेलठीका नगर, थेरगाव) जागामालक चंद्रकांत महादेव सपकाळ (रा. जेएसपीएम कॉलेज जवळ, ताथवडे) यांना अटक केली आहे. तर तिरुपती कॅरिअरच्या गॅस टँकर चालक मोहम्मद रशीद हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक भारत माने यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींवर आयपीसी 379,407,285,336,427,34 व जीवनावश्यक वस्तू अधिनियम, स्फोटक पदार्थ अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास ताथवडे येथील जे.एस.पी.एम कॉलेज परिसरातील मोठ्या जागेत गॅस टँकर मधून नोजल पाईप द्वारे गॅस चोरुन व्यावसायिक गॅस टाक्या भरण्याचे काम चालू होते. त्यावेळी गॅस लिकिज झाल्याने स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात आग लागली. आगीमध्ये जेएसपीएम कॉलेज आवारात पार्क केलेल्या ब्लॉसम स्कुलच्या तीन स्कुल बस, गॅसचा टँकर, गॅस चोरून नेण्यासाठी सिलींडर असलेला टेम्पो जळून खाक झाला होता.
आरोपींनी संगणमत करुन प्रोपीलीन गॅस या जिवनावश्यक वस्तुची बेकायदेशीर व स्वत:च्या फायद्यासाठी चोरी
करुन काळ्या बाजारात वाढीव दरात विक्री करण्यासाठी व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरताना ही घटना घडली.
या घटनेत स्फोट होऊन मानवी जिवीतास धाका निर्माण केला. तसेच मालमत्तेचे नुकसान केले.
तर हे बेकायदेशीर काम करण्यासाठी पैशांच्या मोबदल्यासाठी जागा मालक चंद्रकांत सपकाळ याने त्यांची जागा
आरोपींना उपलब्ध करुन दिली. याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. या गुन्ह्यात आणखी इतर कोणाचा सहभाग आहे
का याचा तपास वाकड पोलीस करीत आहेत.
✒️✒️✒️🗞️🗞️🗞️📰📰🗞️🗞️✒️✒️✒️
टॉप पब्लिक न्यूज रिपोर्टर प्रशांत