Top Public News
 Advertisement

 PCMC

थकीत वाहन दंड होणार कारवाई

शर्मिला पिल्ले   22-08-2023 14:52:05   414

Top Public News pune 

थकित वाहन दंड असल्यास  होणार अटक. मोटर वाहन न्यायालयाकडून 732 जणांना वॉरंट.  पुणे दि. 22 - (प्रतिनिधी) नागरिकांनो सावधान तुम्ही जर वाहतूक उल्लंघन केल्याप्रकरणी

दंड थकविला असल्यास तुम्हाला अटक होऊ शकते या संदर्भात मोटर वाहन न्यायालयाने संबंधित वाहनधारकांवर अटक वॉरंट जारी केले आहे. पहिल्या टप्प्यांमध्ये वाहतूक विभागाला ७३२ जणांचे वॉरंट प्राप्त झाले आहे. त्यामुळे अटक वॉरंट मधील वाहनधारकांनी आठ दिवसांच्या आत मध्ये मोटर वाहन

न्यायालयात उपस्थित होऊन खटल्यासंबंधी निकाल लावून घेणे गरजेचे आहे, अन्यथा आपल्याला अटक करून कोर्टासमोर हजर करावे लागणार आहे, असा इशारा वाहतूक  विभागाकडून देण्यात आला आहे. वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनेकांनी दंड जमा केला नाही. त्यामुळे मोटार वाहन  कायदा अंतर्गत

वाहतूक विभागात 2020 पासून असून न्यायालयासमोर वेळोवेळी उपस्थित राहिले नसलेल्या वाहन धारकांवर मोटर वाहन  न्यायालयात खटले दाखल करण्यात आले होते. दाखल खटल्यांच्या अनुषंगाने कोर्टाने संबंधितांना वेळोवेळी कायदेशीर प्रक्रिया द्वारे यापूर्वीच कळविले होते तरीसुद्धा अद्याप पर्यंत वाहनधारकांनी वाहतूक विभागामध्ये आठवा कोर्टामध्ये तडजोड केली नाही अशा केसेस मोठ्या प्रमाणात कोर्टामध्ये प्रलंबित आहेत याकरिता मोटर वाहन न्यायालयाने संबंधित

वाहनधारकांवर अटक वॉरंट  जारी केले आहे. मोटार वाहन  न्यायालयाकडून पहिल्या टप्प्यामध्ये 732 वॉरंट वाहतूक विभागास प्राप्त झाले आहेत. दंड जमा करण्यासाठी आठ दिवसांची मुदत मोटार वाहन न्यायालयाने वाहतूक विभागाला जारी केलेल्या अटक वॉरंट मधील  संबंधित वाहन धारकांना दंड

जमा करण्यासाठी वाहतूक विभागाने आठ दिवसांची कालावधी दिला आहे. त्यावेळेस संबंधित थकीत दंड वाहन चालकाने मोटर वाहन्यायालयात उपस्थित होऊन खटल्यासंबंधी  निकाल लावून घेणे गरजेचे आहे, अन्यथा पोलीस विभागाकडून संबंधितास अटक वॉरंट द्वारे अटक करून कोर्टासमोर  हजर करावे लागणार आहे  त्यामुळे वाहन धारकांनी / वाहन चालकांनी आपल्या वाहनावर वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याबाबत प्रलंबित

असलेली तडजोड मा. न्यायालयात त्वरित जमा करण्याचे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. वाहतूक उल्लंघन केल्या प्रकरणी मोटर वाहन न्यायालयाने नियमांना पायदळी तुडवणाऱ्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे पहिल्या

टप्प्यात संबंधित 732 वाहनचालकांनी आठ दिवसात न्यायालयात हजर राहून तडजोड  शुल्क जमा करणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांना अटक करून न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.

   टाॅप पब्लिक न्युज शर्मिला पिल्ले रिपोर्टर






 News Videos
 Advertisement