Top Public News
 Advertisement

 PCMC

10 ते 15 गाड्यांची तोडफोड

प्रतिभा पाटील    06-08-2023 21:15:45   130

      टाॅप पब्लिक न्युज पुणे :१० ते १५ वाहनांची तोडफाड; सांगवी पोलिसांनी काढली आरोपींची धिंड!

पिंपरी- चिंचवड शहरातील पिंपळे सौदागरमध्ये वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची सांगवी पोलिसांनी धिंड काढत चांगलीच अद्दल घडवली आहे.ते १५ वाहनांची तोडफाड; सांगवी पोलिसांनी काढली आरोपींची धिंड!

पिंपरी- चिंचवड शहरातील पिंपळे सौदागरमध्ये वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची सांगवी पोलिसांनी धिंड काढत चांगलीच अद्दल घडवली आहे.पिंपरी- चिंचवड शहरातील उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागर येथे तीन जनांनी वाहनांची तोडफोड केली. ही घटना  रात्री घडली होती. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तीन जणांना अवघ्या काही तासातच बेड्या ठोकल्या. दारूच्या नशेत आरोपींनी दगड आणि सिमेंटच्या गट्टूने काटे पेट्रोल पंप ते गोविंद गार्डन पर्यंत वाहनांची तोडफोड केली. यामुळे तेथील  जनतेच्या मनात,  जाणाऱ्या पिंपळे सौंदगरमध्ये भीतीचे वातावरण होते. परंतु, अवघ्या काही तासातच आरोपींना बेड्या ठोकून त्यांची सांगवी पोलिसांनी धिंड काढली आहे. आरोपींना घटनास्थळावर नेवून त्यांना नागरिकांच्या समोरच चांगलाच दम दिला.

टाॅप पब्लिक न्युज  पुणे 






 News Videos
 Advertisement